Home » द रॅशनलिस्ट मर्डर्सचे थाटात प्रकाशन

द रॅशनलिस्ट मर्डर्सचे थाटात प्रकाशन

by नवस्वराज
0 comment

अकोला : हिंदू राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी तारीख १६ पासून फोंडा गोवा येथे अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन अर्थात वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाला उत्साहात सुरूवात झाली. अधिवेशनाची सांगता २२ जून रोजी होईल. संपूर्ण देशातून हिंदू संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. हिंदू राष्ट्राची स्थापना, हिंदूंवर होत असलेले अत्याचार, हिंदू संस्कृतीचे संरक्षण, मंदिर मुक्ती आदी हिंदूंच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर विचार मंथन करण्यात येत असून, संत आणि विचारवंत मार्गदर्शन करीत आहेत.

याप्रसंगी डॉ. अमित थडानी लिखित द रॅशनलिस्ट मर्डर्स या पुस्तकाचे प्रकाशन हिंदू विधीज्ञ्ज परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता सुरेश कुळकर्णी, परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. नास्तिकवादी तसेच शहरी नक्षलवादाशी संबंधित हत्याकांडाच्या तपासात राजकारण सुरू आहे, ठोस पुरावे नसतांना हिंदूत्वनिष्ठांना आरोपी बनवून बेकायदेशीरपणे तुरुंगात डांबण्यात आले. तपास यंत्रणांनी योग्य तपास केला नाही, या हत्यांचा राजकीय लाभासाठी कसा उपयोग होईल हेच बघितले, असे लेखक अमित थडानी म्हणाले.

नास्तिकवाद्यांच्या हत्येनंतर हिंदूत्वनिष्ठांना अतिरेकी ठरवले जाते. परंतु साम्यवाद्यांनी घडवून आणलेल्या हत्यांवर मौन पाळण्यात येते, असे मत वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी व्यक्त केले. जिहादी संघटनांच्या विरोधात खटला लढत आहे. त्यामुळे मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. प्राणघातक हल्ला देखील झाल्याची माहिती पी. कृष्णमूर्ती यांनी दिली. धर्मासाठी बलिदान देणाऱ्यांचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन अधिवक्ता हरिशंकर जैन यांनी याप्रसंगी केले.

error: Content is protected !!