Home » अकोल्यातील शिरल्यात युवतीचा खून

अकोल्यातील शिरल्यात युवतीचा खून

by नवस्वराज
0 comment

अकोला : अकोला जिल्ह्यातील शिरला अंधारे येथे युवतीचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. १८ ते २० वर्षे वयोगटातील या युवतीचे हातपाय बांधून तिला मारून फेकण्यात आले होते.

मृत युवती गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. आज शिरला परिसरात या युवतीचा मृतदेह आढळला. युवतीच्या हात पाय बांधून तिला मारण्यात आले, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. युवतीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर या युवती चा मृत्यू कशामुळे झाला याचे नेमके कारण कळू शकेल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!