अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेचे आयोजन श्री आर.एल.टी विज्ञान महाविद्यालय येथे करण्यात आले होते. यामध्ये श्री शिवाजी महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली
श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अकोला येथील विद्यार्थी आविष्कार स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यामधील सात विद्यार्थ्यांची विद्यापीठस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. यामध्ये पीपीजी प्युअर सायन्समधुन नितीन देशमुख, प्रा.अनुजा मोपारी यांनी मेडिसिन अँड फार्मसी, वाणिज्य व व्यवस्थापन शाखा रोहन बुंदेले, इंजिनिअर अँड टेक्नॉलॉजी पीपीजीमध्ये उल्का पाटील, मेडिसिन अँड फार्मसी युजी कॅटेगिरी श्रावणी बावणेर एग्रीकल्चर अँड ऍनिमल हसबंडरी ज्ञानेश्वर ढोरे या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकरीता निवड झाली आहे.