Home » अकोल्यात आदीपुरूषचा शो बंद पाडला

अकोल्यात आदीपुरूषचा शो बंद पाडला

by नवस्वराज
0 comment

अकोला : धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करीत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अकोल्यात आदीपुरुष या चित्रपटाचा शो बंद पाडला.

ठाकरे गटाचे राजेश मिश्रा, तरुण बगेरे, संतोष अनासने, यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चित्रपट गृह गाठत आदीपुरुष चा शो बंद पाडला व या चित्रपटाचे पोस्टर उतरवले. यानंतर संतप्त शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांची भेट घेत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. अभय खुमकर, बाळू ढोले, गजानन चव्हाण, नितीन ताकवले, किरण ठाकूर, शरद तुरकर, गजानन बोराळे, सागर भारुका, विजय परमार, गणेश पोलाखडे, मनोज बाविस्कर, मंगेश खंडे झाडे, ललित पांडे, संतोष रणपिसे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

error: Content is protected !!