महायुतीचे 48 उमेदवार निवडून आणत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपद करण्याची शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसैनिकांना घेतली. कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महाअधिवेशनात ही शपथ घेण्यात आली. दहा वर्षात केलेल्या कामाबद्दल आणि राम मंदिराच्या उभारणीसाठी यावेळी मोदी-शाह यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. शिवसेना नेत्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वार्षिक सात पुरस्कार देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळणार असेही शिंदे यावेळी म्हणाले.