Home » Lok Sabha Election 2024 : संजय गायकवाड यांनी एका वाक्यात केला खेळ खल्लास

Lok Sabha Election 2024 : संजय गायकवाड यांनी एका वाक्यात केला खेळ खल्लास

Shiv Sena : बुलढाणा मतदारसंघ शिवसेनेचाच, भाजपला देण्याचा प्रश्नच नाही

0 comment

Buldhana : शिवसेनेला लोकसभेच्या केवळ दहा ते अकरा जागा देऊन बोळवण करण्यात येणार असल्याच्या राजकीय चर्चा वायफळ आहे असा ठाम दावा बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केला. राजकारणात तडजोड करावी लागते, मात्र मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागा सोडण्याइतकी तडजोड शिवसेना करणार नाही, असे गायकवाड यांनी नमूद केले. बुलढाणा मतदारसंघ शिवसेनेचाच आहे तो भाजपला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे गायकवाड यांनी सांगितले.

शिवसेना जिथे दुसऱ्या क्रमांकावर राहिली त्या जागा मिळाव्या अशी मागणी आहे. यात काही बाबतीत तडजोड शक्य आहे. शिवसेनेला 21 ते 22 जागा मिळाव्या ही भूमिका  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे मांडल्याचे गायकवाड म्हणाले. बुलढाणा लोकसभेची जागा ही गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेची आहे. याठिकाणी सातत्याने शिवसेनेचा खासदार निवडून येत आहे. त्यामुळे ही जागा भाजपला सोडण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगून त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. बुलढाण्याचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे भाजपने केलेल्या सर्वेक्षणात घसरल्याचे दिसत आहे. यावरून भाजपने बुलढाण्याची जागा आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. मात्र शिवसेना या जागेवरील दावा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे उमेदवार बदलाचा पर्याय भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे ठेवला आहे. त्यामुळे बुलढाण्यात प्रतापराव जाधव यांच्या नावाऐवजी आता आमदार संजय गायकवाड यांच्या नावाची चर्चा होत आहे.

error: Content is protected !!