अकोला : सनातन संस्कृती महासंघाची स्थापना झाली असून, संघटना संपूर्ण महाराष्ट्रात एकूण ३४ उद्दिष्टांवर कार्य करीत आहे. मंगळवार १२ सप्टेंबर रोजी महासंघातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्ष उलटल्यानंतरही देशात ‘एक राष्ट्र, एक कायदा’ अस्तित्वात नसल्यामुळे काही लोक याचा गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने समान नागरी कायदा लागू करावा.
सरकारने काही ब्रिटिशकालीन कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही जाचक अटी असलेले अनेक कायदे अस्तित्वात आहेत, जे नागरीकांसाठी अडचणीचे ठरत आहेत. अशा ब्रिटिशकालीन कालबाह्य कायद्यांचे अवलोकन करून ते रद्द करण्यात यावेत.
भारतावर आदीअनंत काळापासून परकीय आक्रमणे झालीत. आक्रमणकर्त्यांनी भारतीय संस्कृती व सभ्यता नष्ट करण्याचे बरेच प्रयत्न केले. आजही भारतीय संस्कृतीवर परकीय आक्रमण होतच आहेत. फक्त त्याचे स्वरूप बदलले आहे. समाजात फूट पाडत जातीय सलोखा नष्ट करण्याचा राष्ट्रद्रोही प्रयत्न त्या माध्यमातून करण्यात येत आहेत. भारतीय संस्कृतीवर होणारे हे आक्रमण रोखण्यासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावी, अशी मागणी सनातन संस्कृती महासंघाच्यावतीने निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देण्यासाठी विनोद देव, जयंत इंगळे, नरेंद्र कराळे, ऋषिकेश जकाते, हेमल खिलोसीया, अभिजित कराळे, अमित शिरसाट, सुबोध देशमुख, अमित अग्रवाल, रामशास्त्री गदाधर, सचिनशास्त्री जोशी, अर्जुन कीर्तीवार, मोहीत नायसे, धवल प्रजापत, आकाश नळकांडे, आकाश चव्हाण, श्रीयश हातेकर, ऋषभ खिलोसीया, गोविंद जोशी, पीयूष कनोजीया, चेतन घोडके, युवराज राजगुरे, दीपक ठाकूर, पंकज सिधारा, मिनाक्षी पवार, प्राजक्ता सपकाळ, निशांत इंगळे, हेमंत जकाते उपस्थित असल्याचे प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर, मिलिंद गायकवाड, देवानंद गहिले यांनी कळवले आहे.