शेगाव (जि. बुलडाणा) : शेगावचे संत श्री गजानन महाराजांची आज ११३व्या पुण्यतिथी निमित्त मोठ्या संख्येनं भाविक शेगाव येथे दाखल झालेत. संत श्री गजानन महाराजांनी ८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी समाधी घेतली होती. त्यामुळे हा दिवस श्री संत गजानन महाराजांचा पुण्यतिथी उत्सव म्हणून साजरा केला जातो.
ऋषीपंचमीच्या दिवशी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आणि विशेषत: ग्रामीण भागातून हजारो भजनी दिंड्यासुद्धा सहभागी झाल्या. पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रींची पालखी, अश्वरथ, मेनादिंडी आदि वैभवासह संपूर्ण गावात नगर परिक्रमा करण्यात आली. श्रींच्या रजत मुखवट्याची नगर परिक्रमा पालखी काढण्यात आली. श्रींचे समाधी दर्शन व्यवस्था, श्रीमुख दर्शन व्यवस्था, महाप्रसाद, महापारायण कक्ष मंडप आदी ठिकाणी चोख व्यवस्था करण्यात आली होती.