नवी दिल्ली : उद्धट आणि दादागिरी करणाऱ्या बँक कर्जवसुली एजंटला भारतीय रिझर्व बँक आता चाप लावणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ही माहिती दिली.
अनेक लोक होम लोन किंवा वैयक्तिक कर्ज घेतात. मात्र, बराचवेळा बँकांकडून वसुलीसाठी तगादा लावण्यात येतो. यासाठी काही बँका एजंटची मदत घेतात.त्यांच्यामाध्यमातून मोठा दबाव आणला जातो. आता एजंटकडून कर्जदारांवर गुंडगिरी आणि अर्वाच्य भाषा वापरल्यास कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले आहेत.
यापुढे जे चूक करतील त्या संस्थांविरुद्ध गंभीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. दास पुढे म्हणाले की, काही सावकारांकडून वापरल्या जाणार्या कठोर वसुलीच्या पद्धती ही मध्यवर्ती बँकेसाठी चिंतेची गंभीर बाब आहे. वसुली एजंट ग्राहकांशी निर्दयीपणे वागतात, अवेळी कॉलकरुन अपशष्दांचा वापर करतात. मात्र हे आता मान्य होणार नाही. कर्ज वसुलीसाठी नेमण्यात आलेल्या एजंटला आरबीआयने चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.