Home » Old Pension : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संकल्प यात्रा

Old Pension : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संकल्प यात्रा

Protest : ‘व्होट फॉर ओपीएस’च्या माध्यमातून आंदोलन

by नवस्वराज
0 comment

Nagpur : शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते. तरीसुद्धा अजूनही या मुद्यावर निर्णय झालेला नाही. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी व योजनेचे संरक्षण करावे. या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारे ‘व्होट फॉर ओपीएस’ संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले. ही संकल्प यात्रा 19 फेब्रुवारी रोजी संविधान चौक नागपूर येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचे निमित्त साधून सुरू करण्यात आली.

नागपुरातील महाल येथील छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. संविधान चौक येथे जाहीर सभा झाली. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर व राज्यकार्यकारिणी यांच्या हस्ते या संवाद यात्रेचा शुभारंभ झाला. यात्रेचा समारोप मुंबई येथील आझाद मैदानावर 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

सिक्कीम राज्यातसुद्धा जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे. आतापर्यंत सहा राज्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘ओपीएस’ लागू करण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य सरकारने केवळ अभ्यास समिती व अहवालावरच बोळवण केली आहे. यापूर्वी नागपूर हिवाळी अधिवेशनात पेन्शन जनक्रांती महामोर्चा काढण्यात आला होता. शासनाने अजूनही यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कर्मचारीवर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला. जे सरकार जुनी पेन्शन लागू करतील ते सरकार सत्तेवर स्थापन करण्याचा निर्धार राज्यातील 16 लाख कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!