नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नवीन संसद भवनाच्या छतावर राष्ट्रचिन्हाचे अनावरण केले. कांस्य बनवलेल्या या चिन्हाचे वजन 9, 500 किलो आहे आणि त्याची उंची 6.5 मीटर आहे.
This morning, I had the honour of unveiling the National Emblem cast on the roof of the new Parliament. pic.twitter.com/T49dOLRRg1
— Narendra Modi (@narendramodi) July 11, 2022
राष्ट्रचिन्हाला सपोर्ट देण्यासाठी सुमारे 6,500 किलो स्टीलची रचना तयार करण्यात आली आहे. लोकार्पण सोहळ्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, प्रल्हाद जोशी आणि खासदार हरीवंश सिंह उपस्थित होते. मोदींनी संसद भवनाच्या बांधकामात गुंतलेल्या कामगारांशीही संवाद साधला. ते म्हणाले की, नवीन संसद भवनाच्या छतावर राष्ट्रीय बोधचिन्ह बसवण्याचे काम आठ वेगवेगळ्या टप्प्यात पूर्ण झाले आहे. यामध्ये चिकणमातीपासून मॉडेल बनवणे, संगणक ग्राफिक्स तयार करणे आणि कांस्य आकृत्या पॉलिश करणे यांचा समावेश आहे.
अशोक स्तंभ उभारण्यासाठी 9 महिन्यांचा कालावधी लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संसद भवनाच्या नवीन इमारतीच्या छताच्या मध्यभागी ते बसवण्यात आले आहे. या स्तंभाच्या उभारणीत एकूण 8 टप्प्यांत काम करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कॉन्सेप्ट स्केच, क्ले मॉडेलिंग आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स अशा एकूण 8 फेऱ्यांमध्ये ते तयार करण्यात आले आहे. अशोकस्तंभ एकूण 150 भागांमध्ये तयार करण्यात आला होता. हे एकत्र केले गेले आणि छतावर नेल्यानंतर स्थापित केले गेले. एप्रिल महिन्याच्या अखेरीस ते एकत्र करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्याला सुमारे दोन महिने लागले.