Home » Vanchit Bahujan Aghadi : प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसपुढे ठेवली अट

Vanchit Bahujan Aghadi : प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसपुढे ठेवली अट

Rahul Gandhi : काँग्रेसच्या पत्रानंतर वंचितने दिले उत्तर म्हणाले...

by नवस्वराज
0 comment

Akola : भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले आहे. यात्रेत सहभागी होण्यासाठी ‘वंचित’ने काँग्रेसपुढे अट ठेवली आहे. इंडिया आघाडीमध्ये ‘वंचित’चा समावेश होण्याचा मुद्दा रेंगाळला असल्याने अगोदर त्यावर निर्णय घ्या, तरच यात्रेत सहभागी होता येईल, अशी भूमिका अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.

निमंत्रणाला उत्तर देणारे पत्र त्यांनी खासदार राहुल गांधींना पाठवले आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वात मणिपूर ते मुंबई अशी सुमारे सहा हजार 700 किलोमीटरची पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. या पदयात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण ॲड. प्रकाश आंबेडकरांना देण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीने मुंबईत घेतलेल्या संविधान सन्मान सभेचे निमंत्रण खासदार राहुल गांधींना दिले होते. त्या सभेत खासदार राहुल गांधी सहभागी झाले नव्हते. त्यांनी पत्र पाठवून ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेचे कौतुक केले होते. आता काँग्रेसकडून पदयात्रेचे निमंत्रण ॲड. प्रकाश आंबेडकरांना पाठविण्यात आल्याने दोन्ही पक्षांमधील संवाद वाढल्याचे चित्र आहे.

वंचित बहुजन आघाडीला इंडिया आणि महाविकास आघाडीत सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवावे. तेव्हा यात्रेमध्ये सहभागी होता येईल, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीने मागील चार महिन्यांत तीन वेळा काँग्रेसच्या वरिष्ठांना पत्र पाठवले. त्यामध्ये वंचितने इंडिया आघाडीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. ‘वंचित’चा इंडिया आघाडीत समावेश झाल्यास राज्यात महायुतीपुढील आव्हान वाढणार आहे.

Akola News : सर्वोच्च न्यायालयाच्या कलम 370 वरील आदेशावर प्रकाश आंबेडकर नाराज

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!