Home » अकोला महानगराला दूषित पाणी पुरवठा

अकोला महानगराला दूषित पाणी पुरवठा

by नवस्वराज
0 comment

अकोला : महानगराला सद्य:स्थितीत चौथ्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून जुना प्रभाग क्रमांक दहामध्ये नळांना अत्यंत गढूळ पाणी येत आहे. पाणी गाळून घेतल्यावरही भांड्यात खाली गाळ जमा राहातो.

पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक जलवाहिन्या जुनाट व कालबाह्य झाल्यामुळे वेळोवेळी फुटतात त्यामुळे त्यात घाण पाणी शिरते तसेच बऱ्याच अवैध नळजोडण्यांचे पाईप मुख्य जलवाहिनीपासून नालीच्या तोंडापर्यंत आणून सोडलेले आहेत, नाल्या तुंबल्या की पाणी मुख्य जलवाहिनीत घुसते. महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी शहरात मोठमोठे जलकुंभ बांधण्यात आले आहेत, त्यांची वेळोवेळी स्वच्छता करणे आवशयक असूनही, करण्यात येत नाही. महानगरपालिका तर्फे पाण्याची तपासणी देखील केली जात नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरीकांना दूषित पाणी प्यावे लागते आहे.

पावसाळा सुरू झाला आहे. दूषित पाण्यामुळे अनेक नागरीकांना पोटदूखी, मळमळ व उल्ट्यांचा त्रास होत असून टायफाईडची बाधा झाली आहे.  महानगरपालिका प्रशासनाने याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

error: Content is protected !!