मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे संपर्काबाहेर असल्याने राज्यात राजकीय भूकंप आला आहे. विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला असताना एकनाथ शिंदे यांच्यासह चार कॅबिनेट मंत्रिपद, 25 आमदार गायब झाल्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे शिष्य असलेले शिंदे यांनी बंड पुकारल्याने ठाण्यातूनच सेनेला मोठा धक्का बसला आहे.
- माजी वनमंत्री संजय राठोड
- अपक्ष आमदार आशिष जयस्वाल (रामटेक)
- तानाजी सावंत (उस्मानाबाद)
- ज्ञानराज चौघुले (उस्मानाबाद)
- यवतमाळचे पालकमंत्री सांदीपन भुमरे
- शांताराम मोरे (भीवंडी ग्रामीण)
- विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम)
- बालाजी किणीकर (अंबरनाथ)
- भरत गोगावले (महाड)
- महेंद्र दळवी (अलिबाग)
- महेंद्र थोरवे (कर्जत)
- कृषिमंत्री दादा भुसे, नांदगावचे आमदार सुहास कांदे
- सांगोल्याचे ॲड. शहाजीबापू पाटील
- खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर
- कोल्हापूरचे आमदार प्रकाश आबिटकर
- आमदार संजय रायमुलकर