Home » अकोल्यातील कुख्यात गुंड एक वर्षासाठी स्थानबद्ध

अकोल्यातील कुख्यात गुंड एक वर्षासाठी स्थानबद्ध

by नवस्वराज
0 comment

अकोला : गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभाग असलेल्या एका कुख्यात गुंडाला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. एमपीडीए कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या गुंडाला पकडुन अकोला जिल्हा कारागृहात बंद केले आहे.

प्रवीण ऊर्फ अॅटो ऊर्फ सोनु गोपाळ इंगळे (वय २९) हे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कौलखेड भागातील रहिवासी असलेल्या प्रवीण विरुद्ध अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. मारहाण व अनेक प्राणघातक हल्ल्यांमध्येही त्याचा सहभाग होता. त्यामुळे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, पोलिस उपअधीक्षक सुभाष दुधगावकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके, पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर सैरीसे, उदय शुक्ला, खदान पोलिस स्टेशनचे निरीक्षक धनंजय सायरे, कर्मचारी आकाश राठोड यांनी प्रवीण विरुद्ध कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश पारीत करताच प्रवीणला पकडुन जेलबंद करण्यात आले.

error: Content is protected !!