Home » Land Mafiya : नागपुरात भूखंड विक्री करणारी टोळी पकडली; मोक्काची कारवाई

Land Mafiya : नागपुरात भूखंड विक्री करणारी टोळी पकडली; मोक्काची कारवाई

Police Action : बनावट आधार, पॅन, विक्रीपत्र, एनए ऑर्डर जप्त

0 comment

Nagpur : बनावट आधार, पॅन, विक्रीपत्र, एनए ऑर्डर, नागपूर सुधार प्रन्यासच्या फाइल्स, 500 रुपयांच्या नकली नोटा या आधारे भूखंड विक्री करणाऱ्या 18 जणांच्या टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सदर पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून वरील साहित्यासह तीन ऑडी, स्वीफ्ट डिजायर, फोर्ड कार, दोन दुचाकी, नकाशे, बनावट स्टॅम्प, तिकिट, शेतांची कागदपत्र. बँकांमधील बनावट खात्यांचे चेकबुक, बनावट बँक पासबुक, आरटीजीएसचे कोरे फॉर्म, बनावट पासपोर्ट फोटो, गोमास्ता आदी जप्त करण्यात आले आहे. एकूण 18 आरोपींविरुद्ध याप्रकरणी मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

इमाम खान अब्दुल रहीम खान, पवनकुमार कालकाप्रसाद जंगेला, नारायण वर्मा, निशा जाजू उर्फ प्रतिभा विलास मेश्राम, विजय उईके, कौशल संजय हिवंज, अथर्व श्रीकृष्ण भाग्यवंत, भूपेश कवडुजी शिंदे, प्रविण मोरे, साहिल बिलाल शेख, कार्तिक उर्फ रजत शिवराम लोणारे, सिद्धार्थ वासुदेव चव्हाण, मोहम्मद रियाज उर्फ बबलु अब्दुल रऊफ, नासीर हसन खान, इमरान अली अख्तर अली, रुपेश अरुण वारजुरकर, मोहित अली मोहमुद अली, इरशाद अहमद निसार अहमद असे या प्रकरणातील आरोपींची नावेआहेत. अजनी पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या निशा जाजू यांच्या तक्रारीमुळे ही टोळी पोलिसांना गवसली.

असा लागला छडा

निशा जाजू यांच्या नावाने असलेला भूखंड आरोपींनी संगनमत करीत खोटे कागदपत्र, बनावट महिलेला अधिकाऱ्यांसमोर उभे करीत परस्पर विकला होता. त्यामुळे निशा यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे, उपनिरीक्षक संतोश शिरडोळे, सुनील राऊत, प्रलेश कापसे, सविता नाहमुर्ते, संजय सादव, किशोर लोहकरे, संघदीपा सदावर्ते, विक्रमसिंग ठाकूर यांनी तपास करीत भूखंड विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या टोळीविरुद्ध आता महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा 1999 प्रमाणे कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्याला मंजुरी मिळाल्याने संपूर्ण टोळीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!