Home » भिडे गुरुजींच्या तपासणीसाठी डॉक्टरने टाळला सोहळा

भिडे गुरुजींच्या तपासणीसाठी डॉक्टरने टाळला सोहळा

by नवस्वराज
0 comment

सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे यांच्या उपचारासाठी प्रसिद्ध डॉक्टर रियाज मुजावर यांनी कर्तव्य निभावत एक मोठा सोहळा टाळला. रियाज यांनी दाखवलेली कर्तव्य निष्ठा सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे.

सायकलवरून पडल्याने जखमी झालेले संभाजी भिडे यांच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान त्यांच्या हृदय तपासणीसाठी डॉ. रियाज मुजावर यांनी पुरस्कार सोहळ्याला जाणे टाळले. कट्टर हिंदुत्ववादी, अशी संभाजी भिडे गुरुजी यांची ओळख आहे. भिडे गुरुजींसाठी मिरजेतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांनी पुरस्कार प्रदान सोहळयाला जाणे टाळले.

 

रियाज मुजावर

ज्या दिवशी संभाजी भिडे गुरुजी यांची हृदय तपासणी करणे आवश्यक होते, त्याच दिवशी डॉक्टर रियाज मुजावर यांना नेल्सन मंडेला यांच्या नावाने पुरस्कार प्रदान केला जाणार होता. हा सोहळा मुंबईत होणार होता. एका बाजूला संभाजी भिडे गुरुजी यांच्या सारख्या एका व्हीआयपी व्यक्तीची हृदय तपासणी आणि दुसऱ्या बाजूला सर्वोच्च पुरस्कार प्रदान सोहळा. मात्र डॉक्टर रियाज मुजावर यांनी कर्तव्य आधी या भावनेने पुरस्कार सोहळ्याला जाणे टाळत संभाजी भिडे गुरुजी यांच्या हृदय तपासणीसाठी थांबून राहणं पसंत केले.

error: Content is protected !!