Home » Yavatmal Crime : अंत्ययात्रा रोखलेल्या दिपाली मिश्राची हत्याच 

Yavatmal Crime : अंत्ययात्रा रोखलेल्या दिपाली मिश्राची हत्याच 

Police Investigation : गळा आवळून मारण्यात आले, पतीला ठोकल्या बेड्या

by नवस्वराज
0 comment

Murder Case : जामनकर नगरातील विवाहित दिपाली ऊर्फ नंदिनी मिश्रा (वय 26) यांची गळा आवळत हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. पतीसह नातेवाईकांनी कोणतही वैद्यकीय तपासणी न करताच परस्पर अंत्यविधी उरकविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांना डायल 112 या क्रमांकावर तक्रार प्राप्त होताच अंत्ययात्रा थांबवत त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला होता. पोलिसांच्या चौकशीत त्या महिलेच्या पतीनेच तिला गळा दाबून ठार केल्याचे उघड आले आहे. पोलिसांनी क्षणाचा विलंब न करता त्याला बेड्या ठोकल्या आहे.

दिपाली उर्फ नंदिनी मिश्रा (रा. जामनकर नगर, यवतमाळ) असे मृत महिलेचे नाव आहे. मृतक महिला पती व दोन लहान मुलांसह जामकरनगरात वास्तव्यास आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास महिलेचा झोपेतच अकस्मिक मृत्यू झाल्याची घटना पुढे आली. ही बाब पतीने नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांना सांगितली. दिपालीच्या अचानक मृत्यूने परिसरातील सर्वच नागरिक अवाक झालेत पतीसह कुटुंबीयांनी दिपालीच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली. दिपालीचा मृत्यू संशयास्पद असल्याचे अवधूतवाडी पोलिसांना कळले. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेत असतानाच अवधूतवाडी पोलिसांनी बाजोरिया नगरमध्ये अंत्ययात्रा थांबवून सर्वांना घराकडे परत आणले.

खुणांमुळे बळावला संशय

दिपालीच्या आत्याची तक्रार घेत पोलिसांनी दिपालीचे पती महेश मिश्रा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. ठाणेदार ज्ञानोबा देवकते यांनी तपास केला. महेशला तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. दिपालीचा पतीसोबत बुधवारी रात्री वाद झाला होता, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. पोलिसांनी पतीची कसून चौकशी सुरू केली. त्याने पत्नीला हृदयविकाराचा झटका आल्याचे सुरुवातीला सांगितले. मुलांनीही आई चक्कर येऊन पडल्याचे सांगितले. महिलेच्या मानेला व दोन्ही डोळ्याच्या खाली जखमा आढळल्या. त्यामुळे दिपालीचा खून झाल्याचा संशय होता.

वहिनीशीच केले होते लग्न

दिपाली मिश्राचा पहिला विवाह मारेकरी पती महेश याच्या मोठ्या भावाशी झाला होता. मात्र त्याला मद्याचे व्यसन असल्याने तो दिपलीला त्रास द्यायचा. नेमकी ही बाब हेरून महेशने दिपालीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दिपालीला पळवून नेत त्याने सख्ख्या वहिनीशीच लग्न केले होते. तेंव्हापासून ते एकत्र राहात होते, असेही पोलिस तपासात पुढे आले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!