Home » खासदार धानोरकरांची बिघडलेली प्रकृती स्थिर

खासदार धानोरकरांची बिघडलेली प्रकृती स्थिर

by नवस्वराज
0 comment

नागपूर : काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळु धानोकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागपुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना दिल्ली येथे हलविण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना किडनी स्टोनचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खासदार धानोरकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. खासदार धानोरकर यांची प्रकृती अति गंभीर असून ते उपचाराला प्रतिसाद देत नाहीये, अशी अफवा पसरली होती. मात्र या चर्चामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे खासदार धानोरकर यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. धानोरकर यांच्या जवळील व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, खासदार धानोरकर यांना किडनी स्टोनचा त्रास सुरू झाला होता. त्यानंतर नागपुरातील एका खासगी रुग्णालयात किडनी स्टोनवर उपचार करण्यात आले. पण त्यानंतरही पोटात दुखू लागल्याने त्यांना तपासणीसाठी दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल येथे नेण्यात आले.

‘माझी प्रकृती स्थिर असून, कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये किंवा भयभीत होऊ नये. वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील काही दिवस तपासणी, उपचार आणि विश्रांती घेत आहे’, असा संदेश खासदार धानोरकर यांच्या कार्यालयाकडून प्रसारित करण्यात आला आहे. सुमारे सात वर्षांपूर्वी खासदार धानोरकर यांनी ‘वेट लॉस’साठी एक शस्त्रक्रिया केली होती. त्या शस्त्रक्रियेमुळै आतड्यांमध्ये इन्फेक्शन झाले होते. आतड्यांमध्ये झालेल्या इन्फेक्शनवर दिल्लीतील वेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांच्या उपचार सुरू आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!