मुंबई : विधान परिषदेचे अकोल्यातील आमदार अमोल मिटकरी यांच्यावर सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना ना‘राज’ आहे. राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी व्हिडीओतून आ. मिटकरी यांचा समाचार घेतलाय.
बाजारु मटण करीची #औकात सगळ्यांना माहित आहे … त्यामुळे त्याने लायकी आहे तेवढंचं बोलावं…
‘कहा राजा भोज… ? कहा गंगू … pic.twitter.com/Q7bpyQogae— Gajanan Kale (@GajananKaleMNS) April 20, 2022
अमोल मिटकरी यांनी एका शभेत राज यांचा उल्लेख खाज ठाकरे असा केला होता. त्यानंतर मनसेने मिटकरी यांना टार्गेट केले आहे. ‘महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एका बाजारू विचारवंताचा उदय झालाय. हॉटेलमधला वेटर माहिती आहे ना? तो हॉटेलमध्ये गेल्यावर मेन्यूकार्ड पाठ असल्यासारखं बोलतो, तशी याने सुरूवात केलीय’, अशा जहरी भाषेत काळे यांनी आ. मिटकरींवर टीका केली आहे.
काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. ‘दादा’, ‘साहेब’ आणि ‘ताई’ असा उल्लेख करत काळे यांनी मिटकरींनी त्यांच्या नेत्यांनाही हनुमान चालिसा पठणासंदर्भात प्रश्न विचारावा असे काळे म्हणालेत.