Home » आमदार राणा म्हणतात, महाविकास आघाडीचे आमदार मनाने फडणवीसांसोबत

आमदार राणा म्हणतात, महाविकास आघाडीचे आमदार मनाने फडणवीसांसोबत

by नवस्वराज
0 comment

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकारचे आमदार मनाने देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे, असा दावा बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केला. १०१ वेळा हनुमान चालीसाचे पठण करून राज्यसभेच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी आपण आलो आहोत, असे ते म्हणाले.

राणा म्हणाले की, आमदार लक्ष्मण जगताप हे रुग्णालयात दाखल असतानादेखली अँम्बुलन्स व्दारे मतदान करण्यासाठी आले. त्यामुळे फडणवीस यांच्यावर आमदारांचा किती विश्वास आहे, हे सिद्ध होते. शुक्रवारी (ता. १० जून) झालेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी एकूण २८८ आमदारांपैकी २८५ आमदारांनी मतदान केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख या दोघांना न्यायालयीन कोठडीत असल्याकारणाने उच्च न्यायालयाने मतदान करता येणार नाही असा निर्णय दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री तसेच आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या मंत्री आणि आमदार यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदानावर भारतीय जनता पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला होता. मतदान केल्यानंतर त्यांनी आपली मतपत्रिका पक्षाचे निवडणूक निरीक्षकांच्या हातात दिल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला. त्यामुळे या तिन्ही आमदारांचे मतदान बाद करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही मतदान पत्रिका भाजपाचे निवडणूक निरीक्षक चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हातात दिली असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.

error: Content is protected !!