Home » विदर्भातील आठसह १५ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’

विदर्भातील आठसह १५ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’

by नवस्वराज
0 comment

नागपूर : राज्यातील काही भागात मान्सून सक्रिय झाला आहे. १९ ते २१ जून या कालावधीत मान्सून अधिक सक्रिय होणार असून, राज्यातील १५ जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ दिला आहे.

विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळसह पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांनाही १९ ते २१ जून दरम्यान सतर्क राहण्याचा ईशारा देण्यात आला आहे. भारतीय मौसम विभागाच्या नागपूर वेधशाळेने हा ईशारा जारी केला आहे. त्याचा नाकाशाही प्रकाशित करण्यात आला आहे. नागपुरातील वेधशाळेतून विदर्भासह मध्य प्रदेश आणि मध्य भारतातील हमामानावर लक्ष ठेवण्यात येते.

error: Content is protected !!