Home » Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीच्या संभाव्य 48 उमदेवारांची यादी बाहेर

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीच्या संभाव्य 48 उमदेवारांची यादी बाहेर

Mahavikas Aghadi : अकोल्यातून प्रकाश आंबेडकर, अमरावतीत राहुल गडपाले, बुलढाण्यात नरेंद्र खेडेकर

by नवस्वराज
0 comment

शिल्पा अत्रे

Mumbai : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा जवळपास सुटलेला आहे. सर्व 48 जागांवर आघाडीतील सर्व घटक पक्षांचे एकमत झाले आहे. त्यानुसार उमेदवार आणि मतदारसंघांची यादी बाहेर पडली आहे. ही यादी अंतिम नसली, तरी यातील बरीचशी नावे अंतिम मानली जात आहे.

लोकसभा मतदारसंघ निहाय संभाव्य उमेदवार असे आहेत. रामटेक : रश्मी बर्वे, कुणाल राऊत, किशोर गजभिये, तक्षशिला वागधरे काँग्रेस, बुलढाणा : नरेंद्र खेडेकर शिवसेना ठाकरे गट, यवतमाळ-वाशीम : संजय देशमुख शिवसेना ठाकरे गट, हिंगोली : सचिन नाईक काँग्रेस, परभणी : संजय जाधव शिवसेना ठाकरे गट, जालना : शिवाजीराव चोथे शिवसेना ठाकरे गट, छत्रपती संभाजीनगर : चंद्रकांत खैरे शिवसेना ठाकरे गट, नाशिक : विजय करंजकर शिवसेना ठाकरे गट यांच्या नावावर एकमत झाले आहे. पालघर : भारती कामडी शिवसेना ठाकरे गट, कल्याण : सुष्मा अंधारे किंवा आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गट, ठाणे : राजन विचारे शिवसेना ठाकरे गट, मुंबई उत्तर पश्चिम : अमोल कीर्तीकर शिवसेना ठाकरे गट, मुंबई दक्षिण : अरविंद सावंत शिवसेना ठाकरे गट, मुंबई ईशान्य : संजय दिना पाटील शिवसेना ठाकरे गट, मुंबई दक्षिण मध्य : अनिल देसाई शिवसेना ठाकरे, रायगड : अनंत गीते शिवसेना ठाकरे गट यांचे नाव जवळपास निश्चित आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग : विनायक राऊत शिवसना ठाकरे गट, मावळ : संजोग वाघेरे शिवसेना ठाकरे गट, शिर्डी : भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना ठाकरे गट, धाराशिव : ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गट, कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाकडे ही जागा जरी असली तरी ही जागा छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडली जाऊ शकते, हातकणंगले : ( स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी जागा सोडली मात्र अद्याप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मग यामध्ये येण्याची तयारी न दर्शवल्याने ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे आहे.

अकोला : प्रकाश आंबडेकर वंचित बहुजन, शिरूर : अमोल कोल्हे राष्ट्रवादी, सातारा : श्रीनिवास पाटील राष्ट्रवादी मात्र श्रीनिवास पाटील यांच्यानुसार त्यांचा मुलगा सारंग पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी आहे. माढा : लक्ष्मण हाके हे सध्या शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आहे मात्र राष्ट्रवादी चिन्हावर लढणार आहेत. बारामती : सुप्रिया सुळे राष्ट्रवादी, जळगाव : हर्षल माने शिवसेना, रावेर : एकनाथ खडसे राष्ट्रवादी, दिंडोरी : चिंतामण गावित राष्ट्रवादी, बीड : नरेंद्र काळे राष्ट्रवादी, अहमदनगर : निलेश लंके राष्ट्रवादी यांचे नाव यादीत आहे.

अमरावती : बळवंत वानखेडे काँग्रेस आणि मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार राहुल गडपाले राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढण्याची चिन्हे आहेत. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता अधिक आहे. भंडारा : नाना पटोले काँग्रेस, चंद्रपूर : प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे काँग्रेसकडून दावेदार आहेत. यात वडेट्टीवार यांच्या नावाची शक्यता अधिक आहे.

गडचिरोली : डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. नामदेव किरसान आणि डॉ. नितीन कोडवते काँग्रेस ही नावे यादीत आहेत. नांदेड : आशा शिंदे काँग्रेस , लातूर : अजून नाव ठारलं नाही काँग्रेसला जागा सुटणार आहे. धुळे : तुषार शेवाळे आणि शामकांत सनेर काँग्रेस, नंदुरबार : के. सी. पाडवी काँग्रेस, पुणे : रविंद्र धनगेकर काँग्रेस, सोलापूर : प्रणिती शिंदे काँग्रेस, सांगली : विशाल पाटील काँग्रेस, मुंबई उत्तर मध्य : काँग्रेस अजून नाव ठरलेले नाही, मुंबई उत्तर : काँग्रेस अजून नाव ठरलेले नाही, भिवंडी : दयानंद चोरघे काँग्रेस, वर्धा : हर्षवर्धन देशमुख आणि समीर देशमुख काँग्रेस, नागपूर : अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, प्रफुल गुडधे काँग्रेस यांचे नाव यादीत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!