Home » खामगावातील दोन लुटारू पोलिसांच्या जाळ्यात

खामगावातील दोन लुटारू पोलिसांच्या जाळ्यात

by नवस्वराज
0 comment

खामगाव (जि. बुलडाणा) : डोळ्यात मिरची पावडर फेकत लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना खामगाव पोलिसांनी अटक केली आहे. देवीदास ऊर्फ गणेश बलराम आल्यापाग (वय २४) आणि करण राजेंद्र चंग्यारे (वय २५) ही अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

खामगाव शहरातील किसन नगर भागात क्रेडिट अँक्ससेस बँकेची शाखा आहे. नितीन देविदास काकडे (वय २७ वर्षे) या शाखेचे कर्मचारी आहेत. काकडे हे १५ जून रोजी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान बँक मध्ये जमा झालेली (रक्कम ९ लाख १ हजार रुपये) हे स्टेट बँकेत जमा करण्यासाठी त्यांच्या मोटारसायकलने जात होते. याच वेळी बँक पासून ५०० मीटरच्या अंतरावर देवीदास उर्फ गणेश बलराम आल्यापाग (वय २४), करण राजेंद्र चंग्यारे (वय २५ दोघे रा. रावण टेकडी, खामगाव) यांनी काकडे यांना हात दाखवून थांबवले.

काकडे थांबताच त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांच्याकडे असलेली ९ लाख रूपयाची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता. या धक्काबुक्की मध्ये काकडे आपल्या मोटारसायकलवरून खाली पडले. तरीही काकडे यांनी त्यांच्या हातातील बॅग सोडली नव्हती. काकडे यांनी जोरात आरडाओरड केल्याने, परिसरातील लोक गोळा व्हायला सुरुवात होताच देविदास आणि करण या दोघांनी तिथुन मोटारसायकलने पळ काढला होता. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दोघेही चोरटे कैद झाले होते. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अखेर देविदास आणि करण यांना अटक केली आहे. ही कारवाई शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने केली.

error: Content is protected !!