अश्विन पाठक | Ashvin Pathak
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारने राज्यातील 58 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी (ता. 31) काढले. फेब्रुवारी अखेर पर्यंत कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच हे आदेश काढण्यात आले आहे. नागपूरचे पोलिय आयुक्त अमितेश कुमार यांची यात बदली करण्यात आली आहे. गडचिरोलीचे पोलिस उपमहानिरीक्षक (DIG) संदीप पाटील यांना पदोन्नति देत सरकारने राज्याच्या नक्षल विरोधी अभियानाच्या महानिरीक्षक (IG) पदाची जबाबदारी त्यांना दिली आहे.
यापूर्वी गडचिरोलीत पोलिस अधीक्षक (SP) असलेल्या अंकित गोयल यांना पदोन्नती देत त्यांना पाटील यांच्या जागी गडचिरोलीचे उपमहानिरीक्षक (DIG) करण्यात आले आहे. अमरावतीचे पोलिस आयुक्त (CP) यांचे त्याच पदावर प्रमोशन करण्यात आले आहे. त्यापूर्वी त्यांच्या पदाची श्रेणी पोलिस उपमहानिरीक्षक दर्जाची होती. आता पदोन्नतीनंतर त्यांची श्रेणी महानिरीक्षक दर्जाची असेल.