नागपूर : यावर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिवस देशातल्या ७५ प्रसिद्ध स्थळांवर साजरा होणार आहे. २१ जून २०२२ ला आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षात येत असल्याने आयुष्य मंत्रालयामार्फत देशभरातील ७५ प्रसिद्ध स्थळांवर साजरा करण्यात येणार आहे. या शहरांमध्ये नागपूरचाही समावेश करण्यात आला आहे.
केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या मार्गदर्शनात नागपूरमध्ये भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या पुढाकाराने हा आंतरराष्ट्रीय योग दिन कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात येणार आहे. सामान्य नागरिकांना देखील यामध्ये सहभागी होता येणार आहे. त्यामुळे २१ जून रोजी सकाळी ७ ते ७.४५ पर्यंत योगाभ्यासाची प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. नागपूर जिल्हा प्रशासन यासाठी तयारीला लागले आहे.