Home » वारकऱ्यांसाठी विठ्ठल रुख्मिणी विमा सुरक्षा कवच

वारकऱ्यांसाठी विठ्ठल रुख्मिणी विमा सुरक्षा कवच

by नवस्वराज
0 comment

अकोला : पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना विठ्ठल रुख्मिणी विमा छत्राचा लाभ देण्यात येणार आहे. शासनाच्याया निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना विम्याचे सुरक्षा कवच प्राप्त होणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा सुरक्षा कवच महाराष्ट्रातील वारकऱ्यांना मिळणार आहे.

वारीदरम्यान काही वारकरी अपघाताला बळी पडतात. काही जण यात जखमी होतात तर काहींचा मृत्यू होतो. या वारकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या हेतूने हे विमा कवच देण्यात येणार आहे. त्यानुसार वारकऱ्याचा वारीदरम्यान अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. कायमचे अपंगत्व आल्यास एक लाख रुपये देण्यात येणार आहे. अंशत: अपंगत्वासाठी ५० हजार आणि आजारी पडल्यास ३५ हजार रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्च संबंधित वारकऱ्यास देण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाचे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी स्वागत केले आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या डबल इंजिन सरकारने वारकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे आमदार सावरकर यांनी नमूद केले आहे.

error: Content is protected !!