नागपूर : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये हवामान खात्याने मंगळवारी यंदाच्या पाऊसमानाचा अंदाज जारी केला आहे. यंदा देशात सामान्य पाऊसमान होईल. विशेष म्हणजे स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने सोमवारीच यंदा देशात सामान्याहून कमी पाऊसमान होण्याचा अंदाज व्यक्त केला होता.
स्कायमेटच्या अंदाजानुसार पाऊस सामान्य झाला तर त्याचा अर्थ देशातील अन्नधान्याचे उत्पादनही सामान्य राहण्याचा अंदाज आहे. देशातील शेतकरी सामान्यतः एक जूनपासून पेरणीला सुरुवात करतात. याच कालावधीत मान्सून भारतात प्रवेश करतो. पेरणीचा हा हंगाम ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत सुरू राहतो. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, यंदा देशात दीर्घ कालावधी सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होऊ शकतो. ९०ते ९५ टक्के झालेल्या पावसाला सामान्याहून जास्त पाऊसमान म्हटले जाते. तर ११० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाला अतिवृष्टी व ९० टक्क्यांपेक्षा कमी पावसाला दुष्काळ म्हटले जाते.