यांच्या हस्ते ‘कबड्डीचे १०० महायोद्धे’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पवारांसह खा. सुनील तटकरे, खा. गजानन कीर्तीकर, सुनील केदार, राज्यमंत्री अदिती तटकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ कबड्डीपटू शुभांगी दाते – जोगळेकर आणि वसंत रामचंद्र ढवण यांना कबड्डी महायोद्धा कृतज्ञता पुरस्कार देण्यात आला. पवार म्हणाले की, क्रिकेटप्रमाणे भारतीय खेळांना सुविधा मिळायला हव्यात. मी मुख्यमंत्री असताना पुण्यात बालेवाडी सुरू झाले. या क्रीडा संकुलात २५० खेळांची सोय आहे. केदार यांनी तिथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ तयार करण्यासाठी प्रक्रिया पार पाडली. असे विद्यापीठ करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. त्याचे सारे श्रेय केदार यांना आहे.