Home » अनिल देशमुखांची डिफॉल्ट जामिनासाठी कोर्टात धाव

अनिल देशमुखांची डिफॉल्ट जामिनासाठी कोर्टात धाव

by नवस्वराज
0 comment

मुंबई : शंभर कोटी कथित वसुली प्रकरणात अटकेत असलेले माजी मंत्री अनिल देशमुख आणि खाजगी सचिव संजीव पालांडे यांनी मुंबई उच्च न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात डिफॉल्ट जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात सीबीआयने अनिल देशमुख निलंबित पोलिस अधिकारी सचिन संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांना अटक केली होती.

सीबीआयने दाखल केलेले आरोपपत्र अपूर्ण असल्याच्या कारणावरुन जामीन मागितला आहे. त्यामुळे त्यांना फौजदारी प्रक्रिया सीआरपीसी कलम १६२ (२) अंतर्गत विचारात घेतलेल्या वैधानिक जामीनाच्या उपायासाठी अर्ज करण्याचा अधिकार आहे. या जामीन अर्जावर सीबीआयला उत्तर सादर करण्याचे निर्देश विशेष सीबीआयला कोर्टाने दिले आहेत. रिमांडनंतर साठ (60) दिवसांत तपास पूर्ण झाला नाही. सीआरपीसी कलम 167(2) नुसार तपास यंत्रणांना वेळेत तपास पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र, अपूर्ण तपासावर सीबीआयने आरोपत्र दाखल केले असल्याचा दावा देशमुख यांनी अर्जात केला आहे.

error: Content is protected !!