Home » Gadchiroli : गडचिरोलीत धावत्या बसने घेतला पेट, जीवित हानी नाही

Gadchiroli : गडचिरोलीत धावत्या बसने घेतला पेट, जीवित हानी नाही

Fire break out : बसचालकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्रवाशांचे प्राण

by नवस्वराज
0 comment

Gadchiroli : गडचिरोलीत तालुक्यातील मुलचेरा – घोट मार्गावर धावत्या बसने अचानक पेट घेतला. गडचिरोली आगार ची एम एच- 07  सी- 9316 बस दररोज मुलचेरा येथे मुक्कामी येत असते आणि सकाळी ६ वाजता घोट – चामोर्शी मार्गे गडचिरोली जाते.

नेहमी प्रमाणे शुक्रवार 1 मार्च रोजी मुलचेरा येथून घोट – चामोर्शी मार्गे गडचिरोली करिता निघालेल्या बसने मुलचेरा – घोट मार्गावर असलेल्या जंगलात अचानक बस च्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकांनी बघून बस थांबविली. अचानक बसने पेट घेतला असल्याचे निदर्शनास येताच प्रवाशांनी आपला जीव वाचविण्यासाठी बस बाहेर पडले. घाबरलेल्या अवस्थेत प्रवाशी जंगलाच्या दिशेने दूर जाऊन उभे झाले. चालक आणि वाहक देखील आपले सामान बाहेर काढून घेतले आणि झाडाच्या फांद्यानी आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बस मध्ये एकूण सात ते आठ प्रवासी सवेत चालक आणि वाहक होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली आगाराची बस मुलचेरा तालुका मुख्यालयात दररोज रात्री मुक्कामी असते आणि ती बस दररोज पहाटे 6 वाजताच्या सुमारास मुलचेरा वरून घोट-चामोर्शी-भाडभिडी मार्गे गडचिरोलीला जाते. त्यानुसार शुक्रवार एम एच-07 सी-9316 क्रमांकाची एसटी बस नेहमीप्रमाणे आज पहाटे 6 वाजता प्रवाश्यांना घेऊन गडचिरोलीकडे निघाली होती. दरम्यान, घोट पासून 3 किलोमीटर जंगलात बस आली असता बसने अचानक पेट घेतल्याचे बसचालकाच्या लक्षात आले. त्यानंतर बसचालकाने प्रसंगावधान राखात वेळीच बस थांबवून सर्व प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले. यात जवळपास 8 प्रवासी आणि चालक-वाहक असल्याची माहिती पुढे आली असून हे सर्व या अपघातात थोडक्यात बचावले आहेत.

राज्यात आणि विशेषतः गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात दिवसेंदिवस एसटी महामंडळाच्या बसेसची दुरावस्था झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. काही बसेसचे छत निघालेले आहे. कधी एका हातात स्टेरिंग आणि एका हातात वायपर पकडून बसचालकाला बस चालावावी लागते. बसेसच्या दुरावस्थेमुळे प्रवासी, चालक आणि वाहकाच्या जीवाला धोका निर्माण होऊन अपघाताची शक्यता बळावत आहे. प्रत्यक्ष बस कधी आगारात दाखल होतील याची सर्वच जण वाट पाहात आहेत. या दुर्घटनेमुळे जिल्ह्यातील सर्व बसेस लवकरात लवकर बदलून नवीन बसेस आणाव्यात, अशी मागणी प्रवासी करत आहेत. जिल्ह्यात ४० बसेस मंजूर झालेल्या असतानाही त्या एसटी महामंडळाला देण्यात आलेल्या नाहीत.

error: Content is protected !!