Home » माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात सीबीआयकडून तीन गुन्हे

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात सीबीआयकडून तीन गुन्हे

by नवस्वराज
0 comment

मुंबई : नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधील सर्व्हर घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी केली गेली. यानंतर आता 2009 ते 2017 या काळात एनएसई कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याप्रकरणी सीबीआयने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. एमएचएच्या आदेशानंतर सीबीआयने एनएसई घोटाळ्यात बेकायदेशीर फोन टॅपिंगचा गुन्हा दाखल केला आहे. एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण आणि माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यन यांच्यासह अन्य आरोपींशी संगनमत करून शेअर बाजाराच्या यादीत असलेल्या काही कंपन्यांना फायदा करुन देऊन आर्थिक गैरव्यवहार केला. एनएसई सर्व्हरच्या माध्यमातून करण्यात आलेल्या को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने 2018 मध्ये गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. सीबीआयने गेल्या चार वर्षांत केलेल्या तपासाच्या आधारे चित्रा रामकृष्ण, आनंद सुब्रमण्यन यांना अटक केली आहे. तसेच पांडे यांच्या संबंधित मुंबई, चंदीगड, चेन्नई या 16 ठिकाणी सीबीआयकडून छापेमारी देखील करण्यात येत आहे.

मुंबई पोलीस आयुक्त पदी असताना पांडे यांनी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांना विरोधात गुन्हे दाखल करत कारवाई केली होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असलेले अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!