Home » Akola News : रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणाऱ्या 10 जणांना दंड

Akola News : रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणाऱ्या 10 जणांना दंड

Police Action : लोकसभा निवडणुकीमुळे नाकाबंदी करीत तपासणी

by नवस्वराज
0 comment

Dy SP Satish Kulkarni : अकोला शहरातील अतिसंवेदनशिल भागांमध्ये सध्या पोलिस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक व सण-उत्सवांचा काळ असल्याने शहरात नाकाबंदी करीत तपासणीला वेग देण्यात आला आहे. पोलिस आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी एकत्रितपणे काम करीत असल्याची माहिती अकोला शहराचे उपअधीक्षक सतीश कुलकर्णी यांनी दिली.

शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा, आगामी सण-उत्सव व सार्वत्रिक लोकसभा निवडणूक व्यवस्थित पार पडावी यासाठी पोलिस अधीक्षक बच्चन सिंह व अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या नेतृवात व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे. शहरात रामदासपेठ व जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण 09 ठिकाणी आकस्मिक नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी करीता 09 अधिकारी, 40 पोलिस कर्मवारी, दामिनी पथक, 09 होमगार्ड व वाहन तपासणीसाठी शहर वाहतूक शाखेचे 09 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.

रामदासपेठ व जुने शहर हद्दीतील एकूण 09 ठिकाणी 328 वाहनांची तपासणी करण्यात आली. यातील 68 वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून त्यांना 35 हजार 350 रुपयांची दंड ठोठाविण्यात आला. एकूण 08 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. रात्रीच्या गस्तीदरम्यान उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणाऱ्या एकूण 10 जणांविरुद्ध मुंबई पोनिस अधिनियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली. शहरात व्यापक मोहिम पोलिसांनी हाती घेतली आहे. त्यामुळे वाहन चालकांनी लायसन्स, पीयूसी, वाहन नोंदणीची कागदपत्र, इन्शुरन्स आदी सोबत बाळगावे. ट्रिपल सिट वाहन चालवू नये. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन सोपवू नये असे उपअधीक्षक सतीश कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

शहरातील दुकानदारांनी आपली प्रतिष्ठाने नियोजित वेळेत बंद करावी. रात्रीच्यावेळी हुल्लडबाजी करणाऱ्यांचा शोध घेत त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतेही ठोस कारण नसताना विनाकारण रात्री फिरण्याचे टाळावे अशी सूचना पोलिसांनी केली आहे. लवकरच लोकसभा निवडणूक असल्याने संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या आक्षेपार्ह मजकूर, फोटो, पोस्टवरही अकोला पोलिस सायबर सेलच्या मदतीने लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे जातीय सलोखा बिघडेल असे कृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही शहराचे पोलिस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी यांनी दिला आहे.

 

 

 

 

 

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!