Home » Akola Australian Research : इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे संशोधक पथक सिरसोलीत

Akola Australian Research : इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे संशोधक पथक सिरसोलीत

by नवस्वराज
0 comment

Akola | अकोला : तेल्हारा तालुक्यातील सिरसोली नजीक पांढरी येथे इंग्लंड व ऑस्ट्रेलिया येथील संशोधक पथकाने भेट दिली. जवळपास २२३ वर्षांपूर्वी सिरसोली या ठिकाणी मराठ्यांनी इंग्रजांना पराभूत केले होते. इंग्रजांचे नजरेत हिरो ठरलेला कॅप्टन केन यांचेसह शेकडो सैनिक येथे मारल्या गेले होते. याच युद्धात मराठा सेनापती करताजी पाटील जायले यांचेसह अनेकांना वीरगती प्राप्त झाली होती. या युद्धाचा इतिहास शोधण्यासाठी हे पथक सिरसोलीत येऊन गेले. (England & Australia Research Team Visited Sirsoli Village In Telhara of Akola District)

सिरसोली नजीक पांढरी येथे २९ नोव्हेंबर १८०३ रोजी मराठा आणि इंग्रजांमध्ये युद्ध झाले होते. मराठा सरदार दौलत शिंदे व रघुजी भोसले यांच्या सैन्याने लॉर्ड ऑर्थर व्हेलसली आणि स्टीव्हिन्सन यांच्या सैन्यासोबत सात दिवस झुंज दिली होती. मराठ्यांचे सेनापती संत वासुदेव महाराज यांचे पंजोबा कर्ताजी पाटील जायले यांचेसह शेकडो मराठा सैनिकांना येथे वीरगती प्राप्त झाली होती. लॉर्ड वेलस्लीचे कार्यकाळातील कॅप्टन केन हा देखील या ठिकाणी मारल्या गेला होता. इंग्रजांनी कॅप्टन केनच्या स्मृतीत पांढरी येथे समाधी बांधली होती. आता ही समाधी नष्ट झाली आहे.

काही वर्षांपर्यंत येथे थडगे होते. त्याचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी या ठिकाणी कॅप्टन केनचे नातेवाईक येतात. ब्रिटिश सैन्यातील सेवानिवृत्त अधिकारी व इतिहास संशोधक असा मोठा ताफा येथे येतो. यंदा ब्रिटिश आर्मीचे सेवानिवृत्त मेजर जनरल गार्डन कोरियन यांच्या नेतृत्वात जवळपास १२ वयोवृद्ध महिला व पुरुष येथे आले होते. सिरसोलीवर इंग्रजांनी आतापर्यंत अनेक लघुपट तयार केले आहेत. परंतु भारतीय इतिहास संशोधक अद्यापही या भागाकडे फिरकलेले नाहीत.

error: Content is protected !!