Home » Naxal Encounter : कांकेर सिमेजवळ पोलीस-माओवाद्यांमध्ये भीषण चकमक

Naxal Encounter : कांकेर सिमेजवळ पोलीस-माओवाद्यांमध्ये भीषण चकमक

Gadchiroli Police : सुरक्षा दलाच्या प्रत्युत्तरामुळे हल्लेखोर पळाले

0 comment

Maharashtra-Chattisgrah Border : कसनसूर चातगाव दलम आणि छत्तीसगड मधील औंधी दलमचे सशस्त्र माओवादी घातपात करण्यासाठी एकत्र आले असतानाच गडचिरोली पोलिसांनी केलेल्या चोख कारवाईनंतर पोलिस आणि माओवाद्यांमध्ये भीषण चकमक उडाली. आगामी लोकसभा निवडणुकीत घातपात करण्याचा उद्देशाने कसनसूर पासून इशान्येकडे 15 किलोमीटरवर असलेल्या ठिकाणी माओवादी तळ ठोकून होते. जारावंडी पोलिस ठाण्या पासून दक्षिण-पूर्वेस 12 किलोमीटरवर महाराष्ट्र व छत्तीसगडची सीमा आहे. येथे भूमकन गावाजवळ ही चकमक उडाली.

अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांच्या नेतृत्वात विशेष अभियान पथकाचे आठ पथक व सीआरपीएफच्या एका पथकाने जंगल परिसरात तत्काळ माओवाद विरोधी अभियान सुरू केले. जंगल परिसरात शोध मोहिम सुरू असताना माओवाद्यांनी सुरक्षा दलावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराला पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. बुधवारी (ता. 27) रात्री अकराच्या सुमारास सुरू झालेली ही चकमक गुरुवारी पहाटे साडे चारपर्यंत सुरू होती.

बॉम्बचा मारा

 

माओवाद्यांनी अभियान पथकावर बीजीएलचा मारा केला. परंतु पोलिसांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. पोलिस हावी होत असल्याचे पाहून अंधाराचा फायदा घेत माओवादी जंगलात पळून गेले. सूर्योदयानंतर पोलिसांनी जंगलात शोध मोहिम राबविली. चकमकीच्या ठिकाणावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर माओवादी साहित्य, वायर, जिलेटिन कांड्या, बॅटरी, सोलर पॅनल जप्त केले. सध्या सुरक्षा दलाचे जवान जंगलात तळ ठोकून आहेत. माओवाद्यांचा शोध सुरू करण्यात आला असून महाराष्ट्रासह छत्तीसगड पोलिसांनाही सतर्क करण्यात आले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!