मुंबई : मनी लाँड्रींग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यास प्रवर्तन निदेशनालयाने (ईडी) विरोध केला आहे. न्यायालयात ईडीने हा विरोध नोंदविला.
अनिल देशमुख यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यास परवानगी देऊ नये असे ईडीने नमूद केले आहे. देशमुख यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यासंदर्भात दाखल केलेल्या अर्जावर ईडीतर्फे मुंबई सत्र न्यायालयात उत्तर दाखल करण्यात आले. देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख यांच्या खांद्याचा त्रास सुरू आहे. त्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे देशमुख यांच्या वकिलांनी कोर्टात नमूद केले आहे.