Home » महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदारावरही ‘ईडी’पिडा

महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदारावरही ‘ईडी’पिडा

by नवस्वराज
0 comment

नागपूर : नरेंद्र मोदी यांच्या नावाची लाट असतानाही महाराष्ट्रातून विजयी झालेले काँग्रेसचे एकमेव खासदार बाळु धानोरकर यांच्या विरोधातही ‘ईडी’पिडा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीत असलेले धानोरकर यांच्या नातेवाईकांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या मेहुण्याबाबत ‘ईडी’ने चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. प्रवीण काकडे यांच्याविरोधात असलेल्या गुन्हांबाबतही ‘ईडी’कडून पोलिसांकडे विचारणा झालेली आहे. ‘ईडी’च्या नागपूर कार्यालयाकडून चंद्रपूर पोलिसांना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यात त्यांनी प्रवीण काकडे यांच्याविरोधात असलेल्या गुन्ह्यांबाबत चौकशी केली आहे. काकडे यांच्या चौकशीसाठी येणाऱ्या ‘ईडी’ पथकाला सहकार्य करण्याची विनंतही पोलिसांना पत्राद्वारे करण्यात आली आहे. या पत्रामुळे काँग्रेसचे राज्यातील खासदार बाळू धानोरकर यांच्या मेहुणे प्रवीण काकडे यांची लवकरच ‘ईडी’कडून कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसच्या नेतेही ‘ईडी’च्या रडारवर आले आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ व त्यांच्या तीनही मुलांची चौकशी झाली आहे. त्यांच्यावरील सुनावणीचा निकाल बाकी आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली. त्यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्य सरकारसह केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. आता काँग्रेसचे खासदार धानोरकर यांच्या मेहुण्याची माहिती घेण्यास ‘ईडी’ने सुरूवात केली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!