Home » अकोल्याला भूकंपाचा धक्का; कोणतेही नुकसान नाही

अकोल्याला भूकंपाचा धक्का; कोणतेही नुकसान नाही

by नवस्वराज
0 comment

अकोला : अकोल्यात भूकंपाचा धक्का. ३.५० स्केलचा भूकंप. अकोल्यापासून जवळ असलेल्या बार्शीटाकळीतील गावात हा धक्का जाणवला. भूकंपमुळे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.

शनिवार, ११ जून २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास भूकंपाचा हा धक्का जाणवला, असे खडसे यांनी ‘नवस्वराज’शी बोलताना स्पष्ट केले. भूकंपामुळे कोणतीही हानी झाली नसली, तरी अकोला जिल्हा प्रशासनाने अधिकाऱ्यांना अधिक माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत.  यापूर्वी अकोला जिल्ह्याला २३ जून २०२० रोजी भूकंपाचा धक्का बसला होता. त्याचे केंद्र अकोल्यापासून १२९ किलोमीटर दक्षिणेस होते. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार २०२० या वर्षात देशभरात ५० पेक्षा अधिक वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. २०२० पासून अनेक ठिकाणी भूकंपाच्या नोंदीत वाढ झाल्याचेही भूगर्भ विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

error: Content is protected !!