Home » अकोल्यातील वाहतूक व्यवस्थेमुळे शिवभक्त नाराज

अकोल्यातील वाहतूक व्यवस्थेमुळे शिवभक्त नाराज

by नवस्वराज
0 comment

अकोला : जुन्या शहरातील वाहतूक व्यवस्थेमुळे शिवभक्तांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अकोल्यातील विशेष करून जुने शहराकडे जाणारी वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

अकोल्यातील जुने शहरात असलेले श्री राजराजेश्वर हे महानगरातील नागरीकांचे आराध्य दैवत आहे. प्रत्येक सोमवारी या पुरातन शिवमंदिरात दर्शनासाठी सकाळपासून भक्तांची मांदियाळी असते. रात्री आरती व सेज असल्यामुळे वर्दळ अधिक असते. अत्यंत वाहतुकीचा हा रस्ता असल्यामुळे पोलिस प्रशासनातर्फे जयहिंद चौकात बॅरिकेड्स लावण्यात येतात. त्यामुळे जय हिंद चौकातून किल्ला चौकात थेट जाता येत नाही. परंतु काही ऑटो व चारचाकी वाहन चालक किल्लामार्गे बायपास तसेच बाळापूर नाक्याकडे जाण्यासाठी दहीहंडा वेस व जुन्या भाजीबाजारातून वाहने टाकतात.

दहीहंडा वेस परिसरातील रस्ताही अरुंद आहे. भाजी बाजारात हाच अरुंद रस्ता आणखी छोटा होतो. त्यामुळे शिवभक्तांना विशेष करून महिला व लहान मुलांना पायी चालणेदेखील कठीण होते. पोलिस प्रशासनाने दर सोमवारी या दोन्ही रस्त्यांवरून किल्ल्याकडे जाणारी व तिकडून येणारी वाहने येणार नाहीत या दृष्टिकोनातून कारवाई करावी, अशी मागणी भक्तांनी केली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!