नवी दिल्ली : ग्राहकांना आता दर नवीन व्यवहारासाठी डेबिट-क्रेडीट डिटेल्स नमूद करावे लागणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्ड टोकनायझेशनच्या नियमाला लागू करण्यात येणार आहे. १ जुलै २०२२ पासून हा नवीन नियम लागू होणार आहे.
डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डद्वारे करत असलेल्या व्यवहारासाठी नवीन नियम लागू होणार आहे. आतापर्यंत ग्राहकांना कार्डाचे डिटेल्स एखाद्या साईटवर सेव्ह करून ठेवता येत होते. आता तसे होणार नाही. ऑनलाईन चोऱ्या आणि आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्ड टोकनायझेशनच्या नियमाला लागू करण्यात येणार आहे.