संघर्षांवर उपाययोजना सुचवण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने यासंदर्भात आपले धोरण निश्चित करावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत सध्या ९३९ गावांचा समावेश असून योजनेत आणखी काही गावांचा समावेश करण्यात यावा तसेच योजनेत स्थानिकांना उपयुक्त ठरणाऱ्या आणखी कोणत्या गोष्टी देता येतील याचा विचार केला जावा, असे मुख्यमंत्री म्हणाले. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यतील वाढती वाघांची संख्या व होत असलेला मानव-वन्यजीव संघर्ष याची माहिती यावेळी दिली.