अकोला : दिवाळीनिमित्त भरणाऱ्या बाजारामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. सहा ठिकाणी लोखंडी कठडे (बॅरिकेड) उभारून सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे आजपासून दिवाळीपर्यंत तुम्ही खालील मार्गांवरून जाणार असाल तर आपला मार्ग बदला.
लोखंडी कठडे (बॅरिकेड) पॉईंट्स
फतेह चौक, चांदेकर चौक, कोतवाली चौक, तहसील चौक, रवी स्कुटर चौक, महानगरपालिका जवळील पेट्रोल पंप.
पर्यायी मार्ग
बस स्थानक, जयहिंद चौक ते वाशीम बायपास : बस स्थानक चौक, अशोक वाटिका, सरकारी बगिचा, लक्झरी स्टॅन्ड, वाशीम बायपास, हरिहर पेठ मार्गाने जावे लागेल.
बाळापूर नाका, जयहिंद चौक ते बस स्थानक : वरील प्रमाणेच मार्गाचा वापर करावा लागेल.
डाबकी रोड, जयहिंद चौक ते बस स्थानक : डाबकी रोड, दगडीपूल, मामा बेकरी, अकोट स्टॅन्ड, अग्रसेन चौक मार्गे रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॅन्ड असे जावे लागेल. दुसरा मार्ग डाबकी रोड, भांडपुरा, किल्ला चौक, वाशीबायपास, सरकारी बगिचा, अशोक वाटिका मार्गे बस स्टॅन्ड असा असेल, असे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक विलास पाटील यांनी सांगितले.