अकोला : देशासह राज्याचा परिपूर्ण विकास करायचा असेल तर भाजपाशिवाय दुसरा कोणताही चांगला पर्याय नाही. २०२४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास देश पुन्हा पूर्णपणे विकसित व सुजलाम सुफलाम होईल, असा विश्वास भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजपाच्या उपक्रमामध्ये सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळण्यासाठी नमो मोदी अॅप, सरल अॅपमध्ये नोंदणी करण्याची विनंतीही त्यांनी केली.
अकोल्यात संवाद यात्रेदरम्यान बावनकुळे यांनी समाजातील विविध घटकांशी संवाद साधत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाला साथ देण्याची विनंती सर्वांना केली. बानवकुळे यांनी अकोल्यातील सिंधी समाजाशीही संवाद साधला. देशाच्या प्रगतीमध्ये सिंधी समाजाची मोठी कामगिरी आहे, असे ते यावेळी म्हणाले. सिंधी पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. उद्योजक सुरेश संतांनी, सिंधी पंचायतचे अध्यक्ष रमेश जग्ग्यासी यावेळी उपस्थित होते.
मंचावर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल, किशोर मांगटे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार चैनसुख संचेती, माजी नगराध्यक्ष जयंत मसने, अनुप धोत्रे, कृष्णा शर्मा, यात्रा संयोजक बाळ भेगडे, गणेश अंधारे, हरीश अलीमचंदानी , भाजपा नेते विनोद मनवानी, हिरालाल कृपलानी, दीप मनवानी, कन्यालाल रंगवानी, शोभराज राजपाल, प्रकाश आनंदानी, दयाराम रोहडा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद मनवानी यांनी केले. यावेळी मनोहर मनवानी, अॅड. राजेश चावला, विजय सावराणी दयाराम रोहडा कमल आलीमचंदाणी विशाल मनवानी, राहुल पारवानी, सुरेश चंदवानी, अशोक चंदवानी, हितेश आनंदानी, प्रकाश मनवानी, नरेंद्र भाटिया, दिलीप कृपलानी, सुधीर बेलानी, महेश संतांनी, विनय थावरानी, राहुल पारवानी, सुरेश चंदवानी, हरेश चंदवानी, महेश संतांनी, वीरभान कृपलानी, रमेश देठानी, प्रकाश मनवानी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विजय अग्रवाल यांनी केले. परिचय हरीश अलीमचंदानी यांनी केला . आभार प्रदर्शन ब्रह्मानंद वालेचा यांनी केले.