Home » मेळघाटात पाण्यासाठी त्राहीत्राही, पूर्ण गाव फक्त दोन टँँकरवर

मेळघाटात पाण्यासाठी त्राहीत्राही, पूर्ण गाव फक्त दोन टँँकरवर

by नवस्वराज
0 comment

अमरावती : मेळघाटातील खडियाल गावातील लोक एक बादली पाण्यासाठी कासावीस झाले आहेत. गावात फक्त दोनच विहिरी आहेत. ज्या जवळपास कोरड्या पडल्या आहेत, दीड हजार लोकसंख्येचे गाव दररोज पाण्यासाठी दोन ते तीन टँकरवर अवलंबून आहे. अमरावतीमधील एकाही लोकप्रतिनिधींला मात्र त्याचे घेणेदेणे नाही. काही केंद्रात व्यस्त आहेत तर काही राज्यसभा निवडणुकीत. तडफड होत आहे ती सामान्य ग्रामस्थांची.

विहिरीतून पाणी काढण्यासाठी लोक जीव धोक्यात घालतात. घाणेरडे पाणी प्यायल्याने आजार वाढत आहेत. एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी रस्ता नाही. गावात प्रशासनाच्या वतीने दिवसाला दोन ते तीन टँकर दिले जातात. ते पाणी विहिरीत टाकले जाते. विहिरीत असलेल्या डबक्यातून मिळेल ते पाणी घरगुती वापरासाठी व पिण्यासाठी वापरले जाते. यातून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोगराई परसत आहे.

मेळघाटात डिसेंबर जानेवारी महिन्यापासूनच अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होते. खडियाल येथे जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाई निर्माण झाली आहे. 1500 लोकसंख्या असणाऱ्या या गावात आता उन्हाळ्यात तर गावकऱ्यांना पाण्यासाठी अतिशय कष्ट घ्यावे लागत आहेत. गावात दोन विहिरी असून या दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत.

error: Content is protected !!