Home » दूरदृष्टीचा अभाव असलेले महानगरपालिका प्रशासन

दूरदृष्टीचा अभाव असलेले महानगरपालिका प्रशासन

by नवस्वराज
0 comment

अकोला : यंदा जुन आणि ऑगस्ट महिन्यात वरूण राजाची जिल्ह्यात वक्रदृष्टी राहिली. जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे कास्तकारांनी पेरण्या केल्या आणि जिल्ह्यातील पाणी संचय करणाऱ्या प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली. अकोला आणि आसपासच्या गावांना पिण्याचे आणि शेती सिंचनासाठी पाणी पुरवठा करणार्या महान प्रकल्पात तूर्तास ७१ टक्के जलसाठा आहे. सप्टेंबर महिन्यात योग्य पाऊस न झाल्यास येणाऱ्या २०२४चा उन्हाळा अकोलेकरांना भारी जाईल.

अकोल्यात सार्वजनिक नळस्टॅन्ड ही संकल्पना मोडीत निघाली असतांना. ५० ते १०० फूटांवर तोट्या नसलेले सार्वजनिक नळस्टॅन्ड सुरू आहेत. त्यामुळे नळाचे दिवशी हजारो लिटर पाणी सांडपाण्याच्या नालीत वाहुन जाते. मतदारांना खुश करण्यासाठी हा खटाटोप आहे. सामान्य नागरिकांना वेठीस धरणारे महानगरपालिका प्रशासन येथे नांगी टाकते. पाण्याच्या नळाला मीटर नसलेल्यांवर दंडात्मक कारवाई आणि पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कृपादृष्टी असा कारभार आहे. पाण्याची नासाडी करणे हा देखील अपराध आहे, नासाडी करणारे आणि करू देणारे दोघेही दोषी आहेत.

महानगरात सध्या दर चवथ्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येतो. साधारणपणे मार्च महिन्यापर्यंत पाण्याचा वापर कमी असतो. त्यामुळे पाणी पुरवठा पाचव्या किंवा सहाव्या दिवशी केला तरी चालू शकतो. नाहीतर उन्हाळ्यात भयंकर जलसंकटाला सामोरे जावे लागेल. महानगरपालिका प्रशासनाने पाण्याच्या नासाडीवर नियंत्रण ठेवावे तसेच योग्य नियोजन करून पाणी पुरवठा करावा अशी नागरीकांची मागणी आहे.

error: Content is protected !!