Home » Akola Police : अकोला, वाशीममधून दुचाकी चोरणारा गजाआड

Akola Police : अकोला, वाशीममधून दुचाकी चोरणारा गजाआड

Crime Branch Action : गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केली वाहने

0 comment

Bike Theft : अकोला आणि वाशीम जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्यास अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गजाआड केले आहे. दीपक माणिक वानखडे (वय 29, रा. पाचमोरी, अकोला) असे अटक करण्यात आलेल्या बाइक चोराचे नाव आहे. दहीहंडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या अभिजित खोले यांची दुचाकी काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. या चोरीची खोले यांनी पोलिस स्टेशनला तक्रार केली होती.

अकोला जिल्ह्यातील बाइक चोरीच्या घटनांची संख्या बघता पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी प्रकरणाचा छडा लावण्याची जबाबदारी गुन्हे शाखा पोलिसांवर सोपवली. त्यानुसार अपर पालिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक शंकर शेळके, उपनिरीक्षक गोपाल जाधव, कर्मचारी दशरथ बोरकर, गोकुळ चव्हाण, फिरोज खान, खुशाल नेमाडे, लिलाधर खंडारे, अन्सार अहमद, आकाश मानकर, अभिषेक पाठक यांनी तपास सुरू केला. पोलिसांना शनिवारी (ता. 16) दीपक हा बाइक चोरी करित असल्याची माहिती मिळाली. दीपकचा शोध घेत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळून सुमारे 1 लाख 15 हजार रुपयांच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अकोला आणि वाशीम जिल्ह्यात अनेक दुचाकी चोरी केल्याची कबुली दीपकने दिली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!