अकोला : विजेच्या संबंधातील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. महावितरण कंपनीचे वीज पुरवठा करणारे अनेक रोहित्र, वाहिन्या, खांब जुनाट आणि कालबाह्य झाले आहेत. परंतु साधनसामुग्री तसेच कर्मचाऱ्यांची वानवा असल्यामुळे वीज ग्राहकांना त्रास सोसावा लागतो.
जुने शहर काळामारोती मंदिर जवळील ‘काजल निवास’ समोरील विजेचा खांब वाकला आहे, यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. सदर बाब महावितरण कंपनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. कंपनीने खांब तोबडतोब बदलवण्याची व्यवस्था करावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.