Home » Devendra Fadnavis : मिस्टर फडणवीसांचे मिसेस अमृता वहिनीसाठी असे काय केलं वक्तव्य

Devendra Fadnavis : मिस्टर फडणवीसांचे मिसेस अमृता वहिनीसाठी असे काय केलं वक्तव्य

Amruta Fadnavis : चर्चेला उधाण, काय म्हटलेय देवेंद्र फडणवीस यांनी?

by नवस्वराज
0 comment

Nagpur : फडणवीस यांना राजकारणात चाणक्य म्हटले जाते. मात्र, त्यांच्या पत्नीही प्रसिद्धीच्या बाबतीत मागे नाहीयेत. मात्र, त्यांच्या वक्तव्यांमुळे बऱ्याचदा फडणवीस अडचणीतही आले आहेत. मविआ सरकार पडलं तेव्हा देवेंद्र फडणवीस हुडी घालून रात्री बाहेर पडायचे, असा खुलासा अमृता फडणवीस यांनी केला होता. यावरच आता देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल दोन वर्षांनी भाष्य केलं आहे.

लोकमत समुहाचा महाराष्ट्रीयन ऑफ द इअर या सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. याच सोहळ्यात त्यांना मविआ सरकार पडल्याबाबत प्रश्न करण्यात आला होता. त्यांचे आता हे विधान चर्चेत आले आहे.

काय म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांनी?

“अमृताने जे सांगितलं आहे ते खोटं आहे कसं काय म्हणणार? राजकीय बाबतीत माझी एक इच्छा असते अर्थात माझी तेवढी हिंमत नाही माझी पण त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावली तर बरं होईल, कारण असे असे सिक्रेट त्यांनी सांगितलेत ते काय करायचं? पण तो काळ आता गेला आता काही चमत्कार करण्याची आवश्यकता नाही.” असं मिश्किल उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. जे चांगलंच चर्चेत आहे.

आधी सुद्धा झाली हिच गम्मत

35 पुरणपोळ्यांबाबत जेव्हा अमृता बोलली तेव्हा मी कुठेही गेलो की लोक माझ्यासमोर पुरणपोळ्याच ठेवायचे. आम्हाला सांगायचे वहिनींनी सांगितलंय तुम्हाला पुरणपोळ्या आवडतात. शेवटी मी जाहीर कार्यक्रमात अनेकदा सांगितलं आणि आता पुन्हा सांगतो माझा आवडता पदार्थ पुरणपोळी नाही. कृपया मला पुरणपोळी देऊ नये.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!