भूषण इंदोरिया | Bhushan Indoriya
Akola : अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारीला करण्यात आली. त्यादिवशी अकोल्यात मोठा जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी महानगरातील द्वारका नगरीत सुंदरकांड पठन करण्यात आले. सुंदरकाडनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी हिमांशू शर्मा यांनी पुढाकार घेतला. हिमांशू शर्मा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. सातत्याने विविध कार्यक्रम, उपक्रमासाठी पुढाकार घेतात. द्वारका नगरातील अजय शर्मा, जय शर्मा, सुनिल शर्मा, संतोष शर्मा यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य केले. विजय शर्मा, साहिल शर्मा, गोलू शर्मा, गोपाल शर्मा, मयूर शर्मा यांनी रामभक्तांना महाप्रसादाचे वितरण केले.
द्वारका नगरातील मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमामुळे परिसरात उत्साह पसरला होता. ‘जय श्रीराम’, ‘जय जय श्रीराम’च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते. ठिकठिकाणी लावण्यात आलेले भगवे झेंडे, पताका व रोषणाईमुळे परिसर उजळून निघाला होता. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरीक सहभागी झाले होते.
द्वारका नगरीतील व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा👈