Home » Cyber Crime : ‘इंदिरा-सेस ॲप’मुळे अमरावतीकराने 84 लाख रुपये गमावले

Cyber Crime : ‘इंदिरा-सेस ॲप’मुळे अमरावतीकराने 84 लाख रुपये गमावले

Share Market : शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीचे दाखविले आमिष

by नवस्वराज
0 comment

भूषण इंदोरिया | Bhushan Indoriya

Amravati : एका सायबर लुटारूने अमरावती येथील पंचवटी कॉलनी येथील रहिवासी मोहन उत्तमराव गोहत्रे यांना 84 लाख 79 हजार 436 रुपयांचा गंडा घातला आहे. शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीवर भरपूर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ही फसवणूक करण्यात आली आहे.

फसवणूक करणाऱ्याने सोशल मीडियावरून मोहन गोहत्रे यांच्याशी संपर्क साधला. शेअर मार्केट समूहाशी जुळण्‍याचा सल्ला दिला. शेअर बाजारात गुंतवणुकीवर भरपूर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. सायबर फसवणूक करणाऱ्याने गोहत्रे यांना ‘इंदिरा-सेस ॲप’ डाऊनलोड करण्यास सांगितले. गोहत्रे यांनी आमिषाला बळी पडत हे ॲप डाऊनलोड केले. संधी मिळताच सायबर लुटारूने त्यांना विविध बँक खात्यांमध्ये रक्कम पाठवायला भाग पाडले. त्यातून चोरट्याने गोहत्रे यांच्या खात्यातून 84 लाख 79 हजार 436 रुपये काढून घेतले. कधीही न पाहिलेल्या व्यक्तीकडून शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मोहन गोहत्रे यांनी सायबर ठाण्यात तक्रार दाखल केली. गोहत्रे यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

इंटरनेटशिवाय मिळणारी मोबाईल बँकिंग सेवा आता मोफत

error: Content is protected !!